अखेर हॉकीच्या जादूगाराला भारतरत्न !

dhyanchand
नवी दिल्ली – हॉकीच्या जादूगाराला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मिळण्याच्या दृष्टिने हालचालींना वेग आला असून हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा अशी लेखी शिफारस केली आहे. या शिफारशीची माहिती लोकसभेत पत्राद्वारे देण्यात आली आहे. यावेळी भारतरत्नसाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे.

अनेक वर्षा आधीपासूनच मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. यूपीएसरकारनेही ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र ध्यानचंद यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment