मुख्यमंत्रीपदाचा विचार सोडला- अजित पवार

pawar
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उतरण्याची इच्छा होती मात्र आता हा विचार बाजूला सारला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले विधानसभा निवडणुका काँग्रेस सोबत लढविण्याचा निर्णय झाला असला आणि अधिक जागांची आमची मागणी असली तरी आघाडीत बिघाडी होऊ शकते हे लक्षात घेऊन आम्ही राज्यातील सर्व २८८ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी युती होणार अशा समजात गाफील राहू नये.

काँग्रेसच्यासह आत्तापर्यंत दोन वेळा आम्ही निवडणूक लढविली. त्यावेळी कॉग्रेसने जागांच्या संख्येसाठी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या सीटचा आधार घेतला होता त्यामुळे यंदाही याच आधारावर जागा वाटप झाले पाहिजे या मताशी मी ठाम आहे. निवडणूक पूर्व सर्वेक्षणांचे जे निकाल जाहीर केले जातात त्याकडे आपण लक्ष देत नाही असे सांगून ते म्हणाले कॉग्रेंस भाजपकडे सामुदायिक नेतृत्त्व आहे आम्हीही सामुदायिक नेतृत्व देऊ. मात्र तरीही वेळ आल्यास राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी आम्ही केली आहे.

Leave a Comment