प्रिन्स विल्यम्स बनणार अॅम्ब्युलन्स पायलट

pilet
लंडन – राजघराण्याचे भावी वारसदार प्रिन्स विल्यम्स येत्या एप्रिल मे मध्ये एअर अॅम्ब्युलन्स पायलट म्हणून काम सुरू करणार आहेत. इस्ट इंग्लियन एअर अॅम्ब्युलन्स साठी दिवस व रात्र अशा दोन्ही शिफ्टमध्ये ते काम करणार आहेत.

रॉयल घराण्याच्या चॅरिटी विभागाचे मुख्य अधिकारी पॅट्रीक या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की या कामामुळे विल्यम्स खूप आनंदात आहेत. केंब्रिज एअरपोर्टवर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हा एअरपोर्ट ड्यूक विल्यम्स आणि डचेस केट यांच्या नव्या घरापासून अगदी जवळ आहे. या कामासाठी त्यांना पगार दिला जाणार आहे मात्र तो पगार ते चॅरिटीसाठी दान करणार आहेत. या शिवाय राणीकडून त्यांच्यावर सोपविलेली कामे आणि जबाबदार्‍याही ते पार पाडणार आहेत.

गतवर्षी प्रिन्सने आरएएफ शोध व बचाव पायलट पदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Comment