पोटनिवडणूकीसाठी मोहन जोशी, सुनील तटकरेंना संधी

vidhan-bhavan
मुंबई- लोकसभेवर निवडून गेल्याने शिवसेनेचे आमदार अरविंद सावंत व विनायक राऊत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून मोहन जोशी व राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्ज दाखल केले असून दोन जागांसाठी आलेले दोनच अर्ज पाहता व विधानसभेतील संख्याबळ पाहता या दोघांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अपक्षांसह 160 पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे कोणताही उमेदवार न देण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेने घेतल्याचे कळते.

राऊत व सावंत यांनी जून महिन्यातच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे आता पोटनिवडणूकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीनपर्यंत मुदत होती. या दोन जागांसाठी काँग्रेसकडून मोहन जोशींना संधी दिली गेली आहे. तर, राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment