गैरहजर राहण्यासाठी सचिनला रजा मंजूर

sachin
नवी दिल्ली- राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन यांनी सचिनला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळात गैरहजर राहण्यासाठी रजा मंजूर केल्याचे सोमवारी सांगितले.

राज्यसभेतील अनुपस्थितीवरुन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्यावर विरोधक सदस्यांनी सोमवारी पून्हा आक्षेप नोंदवला. संसदेचा आणि देशाचा सतत गैरहजर रहाणे हा अपमान असल्याचे विरोधकांचे म्हणणे असून मागच्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका समारंभासाठी सचिन आला असून देखील तो संसद भवनाकडे फिरकला सुद्धा नाही. सततच्या गैरहजेरीचे आपले म्हणणे सचिनने सभागृहात मांडण्याची मागणी राज्यसभेच्या अन्य सदस्यांनी केली.

यावर सचिनने कौटुंबिक कामे असल्याचे कारण देत उर्वरित अधिवेशनालाही गैरहजर राहण्याची परवानगी मागितली असून त्याने आपल्याकडे सुट्टीचा अर्ज दिला असल्याने सचिनची ही रजा मंजूर करण्यात आल्याचे कुरीयन यांनी राज्यसभेत सांगितले.

Leave a Comment