१८ वर्षाखालील गोविंदांवर उच्च न्यायालयाची बंदी

high-court
मुंबई- दोन बालगोविंदांचा झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने १८ वर्षाखालील बालगोविंदांना मनो-यांत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तसेच दहीहंडीची उंचीही २० फुटांच्यावर म्हणजेच चार थरांपेक्षा अधिक ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

राज्य सरकारने या संबधी सादर करण्यात आलेल्या याचिकेवर निवेदन सादर केले. न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला असून राज्य सरकार कोणत्या कायद्यानुसार कारवाई करणार हे या परिपत्रक नमूद करण्यात येणार आहे. जमिनीवर गादी टाकून त्यावर थर लावण्याचा सल्ला देत काँक्रिटच्या रस्त्यांवर दहिहंडी उभारण्यास परवानगी न देण्याची सूचना ही न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. पथकांमधील बाल गोविंदांवर पोलीस कडक नजर ठेवणार आहेत. दरम्यान, २० फुटांपर्यंत दहीहंडीचे थर लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली आहे.

Leave a Comment