सतीश शेट्टी हत्या प्रकरण; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

satish-shetty
पुणे- सीबीआयने आज न्यायालयात माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती नसल्यामुळे क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि या हत्याप्रकरणी मारेक-यांचा तपास लागणे अशक्य असल्याचे सांगत ही केस बंद करण्यात यावी असे म्हटल्याचे समजते आहे.

सीबीआय मागील चार वर्षापासून 2010 मध्ये शेट्टी यांच्या झालेल्या हत्येचा तपास करीत असून केंद्रात मोदी सरकार आल्याने व सतीशच्या हत्येत आयआरबी कंपनीशी संबंधित लोक असल्याने आम्हाला न्याय मिळणार नाही असे दोन महिन्यापूर्वीच वाटले होते असे सतीश शेट्टींचे बंधूने म्हटले आहे.

सतीश शेट्टी हत्याप्रकरणात आतापर्यंत सीबीआयने सुमारे 900 लोकांची चौकशी केली होती. तसेच 550 हून लोकांचे जवाब नोंदवले होते. याचबरोबर या हत्या प्रकरणाची चौकशी करणा-या आजी-माजी पोलिस व आयआरबीच्या सुमारे 26 अधिका-यांची लाय डिटेक्टर व पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली होती. तरीही सीबीआयला या हत्याप्रकरणातील मारेक-यांना शोधण्यात अपयश आले आहे. सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात पहिल्यापासून राजकीय लागेबांधे असल्याचा संशय होता. आता ही केसच बंद करून टाकण्याचा रिपोर्ट सादर केल्याने सतीश शेट्टींच्या कुटुंबियांना आता कधीच न्याय मिळणार नसल्याची खंत राहणार आहे.

Leave a Comment