शांतता चर्चा फिस्कटल्यामुळे रक्तपात सुरूच

gaza
गाझा – दोन हजारावर बळी घेणारा रक्तरंजित संघर्ष थांबविण्यासाठीची शांतता चर्चा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर काही वेळातच इस्रायलने गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ले केल्यामुळे यात अनेकांचा बळी गेला आहे.

ही शांतता चर्चा कैरोमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आयोजित करण्यात आली होती. पण, इस्रायलने आपल्या जाचक अटी कायम ठेवल्या, त्यास विरोध करताना पॅलेस्टाईनने चर्चेतून बाहेर पडण्याची धमकी दिल्यामुळे ही चर्चा पुन्हा विस्कटली. यानंतर काही वेळातच इस्रायलने गाझा पट्टीच्या विविध भागांमध्ये जोरदार हल्ले सुरू केले. हमास बंडखोरांच्या १५० ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आले असून, यात १५ जण ठार झाले आहेत. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत.

Leave a Comment