विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यास आबांचा राजकारण संन्यास

rr-patil
सांगली : गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना थेट आव्हान देत मी तासगावमधून प्रचंड मतांनी विजयी झालो, तर तुम्ही खासदारकी सोडा आणि पराभूत झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन असे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळावा सांगलीत सुरू असून यादरम्यान आबा बोलत होते. मला आव्हान देणा-याने पुढे यावे. मी मैदानातच आहे. मी प्रचंड मतांनी विजयी झालो, तर खासदारकी सोडण्याची तयारी ठेवा आणि मी पराभूत झालो, तर राजकारण सोडायला मी तयार आहे, अशी भूमिका आबांनी जाहीर केली. यावेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

Leave a Comment