राज्यातील पहिल्या ट्रॉमा केअर सेंटरचे लोकापर्ण

ajit-pawar
पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ससुन रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

ससुन रूग्णालयात या वेळी वैद्यकीय अतिदक्षता, डायलिसीस आणि आंतररूग्ण कक्षाचेही लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, वैद्यकीय शिक्षण सचिव मनिषा म्हैसकर, अजय चांदणवाला आदी उपस्थित होते. ससुन रूग्णालयात राज्यातील विभिन्न भागातील रूग्ण उपचारासाठी येत असतात. या नव्या सेवेचा फायदा होणार आहे.

Leave a Comment