युनूस खानने तोडला सचिनचा विक्रम

yunus-khan
गाले : श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणारा फलंदाज पाकिस्तानचा अनुभवी युनूस खान बनला असून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात युनूसने हा विक्रम केला.

पहिल्या डावात १७७ रन्सची खेळी खेळणारा युनूस दुसऱ्या डावात केवळ १३ रन्सवर बाद झाला. पण त्याने श्रीलंकेविरुद्ध एकूण १९९८ धावा काढल्या आणि त्याने तेंडुलकरपेक्षा तीन रन्स अधिक केले आहेत.

श्रीलंकेविरूद्ध सचिनने २५ कसोटींमध्ये १९९५ रन्स केले असून यात नऊ शतकांचा समावेश आहे. युनूसने २५ कसोटींमध्ये खेळून सर्वाधिक १९९८ रन्स काढले. त्याने श्रीलंकेविरुद्ध सात शतक लगावले आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यांच्या यादीत इंझमाम उल हक १५५९ रन्ससह तिसऱ्या आणि राहुल द्रविड १५०८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment