मुख्यमंत्री कोट्यातून घरे लाटणाऱ्यांवर करा दाखल गुन्हा

high-court
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घर लाटणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यांची बेकायदेशीर घरे ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला आदेशही दिले आहेत. याबाबतची याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हसन मुश्रीफ, नारायण राणे, जयंत ससाणे, वसंत पुरके, उद्धव ठाकरे, जयप्रकाश छाजेड, चरणजीतसिंग सप्रा यांच्यासह डझनभर राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावे एकापेक्षा जास्त घरे असल्याचे आतापर्यंत झालेल्या चौकशीत समोर आले असुन यामध्ये मुख्यमंत्री कोट्यातून ही घरे लाटल्याचे उघड झाले आहे.

Leave a Comment