महाराष्ट्रात मुंबई वगळता पेट्रोल पंप बंद

petrolpump
मुंबई – महाराष्ट्रातील ४१०० पेट्रोल-डिझेल पंप मालकांनी राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील विविध करांविरोधात बारा तासांचा बंद पुकारला असून मुंबईतील ५०० पेट्रोल-डिझेल पंपमालक या संपात सहभागी झालेले नसल्यामुळे मुंबई वगळता राज्याच्या अन्य भागात काही प्रमाणात या संपाचा परिणाम दिसत आहे.

एलबीटी राज्यातील 25 शहरात लागू करण्यात आला आहे. मात्र एकच करप्रणाली राज्यातल्या सर्व शहरात राबवावी अशी पेट्रोलपंप धारकांची मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल मालक संघटना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत.

राज्य सरकारला कर आकारणीतील अनेक त्रुटी व त्यातून होणाऱ्या नुकसानाची माहिती संघटनेच्या वतीने सांगण्यात आली आहे. मात्र तरीही राज्य सरकारकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पेट्रोल व डिझेल पंप मालकांनी हा संपा पुकारला आहे.

Leave a Comment