मनसेला मिळेना विधानसभेसाठी उमेदवार ?

raj
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपले खाते देखील उघडता आले नव्हते तरी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उडी मारली आहे. मात्र निवडणुकीपासून मनसेचे शिलेदार लांब राहत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसेकडे 288 पैकी अर्ध्या जागांवर लढण्यासाठी उमेदवारच नाही आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे जरी स्वत: निवडणूक लढणार असले तरी त्यांच्या पाठिशी बळ नसेल, तर विजय कसा मिळणार? हा प्रश्न सध्या मनसेच्या धुरंधरांना पडला आहे. कारण यंद्याच्या निवडणूकीत पुरेसे उमेदवारही राज ठाकरेंना मिळेनासे झाले आहेत. एकूण 288 जागांपैकी निम्म्या जागांवर योग्य उमेदवारच पक्षाला सापडलेले नसून त्यात सध्याच्या 11 आमदारांपैकीही काहींची मैदानात उतरण्याची तयारी नसून म्हणूनच की काय आता मनसेचे नेते किंगमेकर होण्याची भाषा करत आहेत.

Leave a Comment