नेपाळ भारताला पुरविणार टोमॅटो

tomato
चेन्नई – भारतात गगनाला भिडलेले टोमॅटोचे भाव पाहता नेपाळने स्पर्धात्मक किंमतीत भारताला टोमॅटो पुरविण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे भारतातील टोमॅटोचे भाव कमी होण्यास मदत मिळणार आहे. चेन्नई येथे नुकत्याच भरलेल्या एका संमेलनात भाग घेण्यासाठी आलेले नेपाळचे कृषीमंत्री हरिप्रसाद पराजुली यांनी ही घोषणा केली आहे.

पराजुली म्हणाले की मध्य पहाडी भागात जून ते नोव्हेंबर हा टोमॅटो उत्पादनाचा काल आहे. नेपाळमध्ये आता मोठ्या प्रमाणावर कृषी सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला मदत म्हणून ठोक भावात २० रूपयांपेक्षा कमी दराने आम्ही टोमॅटो पुरवू शकतो. भारत नेपाळ दरम्यान वाहतूक व्यवस्था आहेच त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना आम्ही हा पुरवठा करू शकणार आहोत. भारतात सध्या टोमॅटोचे दर किलोला ८० रूपयांवर गेले आहेत ते यामुळे कमी होऊ शकतील. तसेच दोन्ही देशांतील व्यापार संबंधही आणखी सुधारू शकतील.

परजुली चेन्नई येथे भरलेल्या एमएस स्वामीनाथन रिसर्च फौंडेशनच्या रोल ऑफ फॅमिली फार्मिंग विषयावरील चार दिवसांच्या आशिया पॅसिफिक संमेलनात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

Leave a Comment