त्सोंगाने जिंकली रॉजर्स कप स्पर्धा

jo
टोरांटो – जो विलफ्रेड त्सोंगाने रॉजर्स कप टेनिस स्पर्धेचे जेतेपद अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररला ७-५,७-६ (३) असे सरळ सेटमध्ये नमवून पटकावले.

स्पर्धेत त्सोंगाला तेरावे तर, फेडररला दुसरे सीडींग मिळाले होते. या मोसमातील पहिले एटीपी जेतेपद त्सोंगाने पटकावले. आतापर्यंत त्याने एकूण ११ एटीपी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्सोंगाने या स्पर्धेत त्याच्यापेक्षा वरचे सीडींग असलेल्या अव्वल टेनिसपटूंना पराभवाचे पाणी पाजले.

त्सोंगाने गुरुवारी नोवाक जोकोविच, शुक्रवारी आठव्या सीडेड अँडी मरे आणि शनिवारी ग्रीगॉर डीमीट्रोव्हला पराभूत केले होते. अव्वल सीडेड टेनिसपटूंना पराभूत केल्याने फेडरर विरुध्द अंतिम सामन्यामध्ये खेळताना त्सोंगाच आत्मविश्वास उंचावलेला होता. फेडररने या सामन्यात अनेक चूका केल्या तसेच त्सोंगाची दमदार सर्व्हीस आणि जमिनी लगतच्या फटक्यांनी फेडररला निष्प्रभ केले.

Leave a Comment