अल कायदा सोडून आयएसआयएसकडे दहशतवादी संघटनाचा ओढा

terrorist
वॉशिंग्टन- आजपर्यंत जगभरात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करून उच्छाद मांडणार्‍या ओसामा बिन लादेनच्या अल कायदाला आता गळतीचे ग्रहण लागले असल्याचे अमेरिकी गुप्तचर संघटनांच्या अहवालात ममूद करण्यात आले आहे. हा अहवाल सांगतो की इराक आणि सिरीयातील भूभागावर ताबा करून तेथे इस्लामिक राज्य स्थापनेची घोषणा केलेल्या आयएसआयएसला छोट्यामोठ्या अनेक दहशतवादी संघटना सामील होत आहेत अशी बातमी वॉशिग्टन पोस्टने दिली आहे.

अमेरिकन गुप्तचर संघटनेतील अधिकार्‍यांचा हवाला देऊन असेही सांगितले गेले आहे की आयएसआयएसची विजयी घोडदौड अशीच सुरू राहिली तर परिस्थितीला गंभीर वळण लागण्याची भीती आहे. अल कायदा सोडून ज्या अनेक छोट्या मोठ्या दहशतवादी संघटना या संघटनेला मिळत आहेत त्यामुळे आयएसआयएसची ताकद वाढत चालली आहे. गेल्या काही महिन्यात अनेक संघटना आयएसआयएसला येऊन मिळाल्या आहेत. पाकिस्तानातील तेहरीक ए खिलाफत ही अल कायदाशी नाते तोडून आयएसआयएसशी निष्ठा व्यक्त करणारी दक्षिण आशियातील पहिली दहशतवादी संघटना असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment