अमेरिकेच्या लिडेस्कायच्या नावे नवा विश्वविक्रम

Katie-Ledecky
कॅलिफोर्निया – अमेरिकेची महिला जलतरणपटू केटी लिडेस्कायने अमेरिकन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महिलांच्या 400 मी. फ्रिस्टाईलमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. या क्रीडा प्रकारात शनिवारी 3 मिनिटे, 58.86 सेकंदांचा अवधी घेत लिडेस्कायने नवा विश्वविक्रम करताना इटलीच्या पेलीग्रिनीने 2009 साली नोंदविलेला 3 मिनिटे, 59.15 सेकंदांचा विश्वविक्रम मागे टाकला. अमेरिकेच्या लिडेस्कायने या स्पर्धेत 400, 800, 1500 मी. फ्रिस्टाईलमध्ये देखील विश्वविक्रम केले आहेत.

Leave a Comment