महाराष्ट्रात मोदींची जादू युतीला सत्तेवर आणणार

naren
मुंबई- लोकसभा निवडणकांदरम्यान दिसलेल्या मोदींच्या गारूडाचा प्रभाव अद्यापीही कमी झालेला नसून महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांत मोदींची जादू युतीला सत्तेवर आणेल असे एबीपी न्यूज व नेल्सन यांनी संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे सर्वेक्षण २२ जुलै ते ६ ऑगस्ट या दरम्यान केले गेले. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १४४ जागांवर हे सर्वेक्षण केले गेले आणि त्यात २१७११ मतदारांची मते विचारात घेतली गेली.

या सर्वेक्षणात यंदाच्या निवडणुकात महाराष्ट्रात सेनाभाजप महायुतीला २१० जागा मिळतील. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला ५५ जागा मिळून त्यांचा सुफडा साफ होईल. मनसेला १० व अन्य पक्षांना १३ जागा मिळतील. राज्यात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले तर कॉग्रेंसला ५५, राष्ट्रवादीला ३८, भाजपला ११२, सेनेला ६२ तर मनसेला ११ जागा मिळतील. रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळणार नाही. अन्य पक्षांना २० जागा मिळतील.

तिसर्‍या शक्यतेप्रमाणे जर जागावाटपात समझोता झाला नाही व भाजप, राष्ट्रवादी व मनसे एकत्र येऊन लढले तर कॉगेंसला ३५, भाजप मनसे राष्ट्रावादी युतीला २००, सेनेला ४० व अन्य पक्षांना १३ जागा मिळतील असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढले गेले आहेत. हरियानात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे हे सर्वेक्षण सांगते.

Leave a Comment