इबोला;खबरदारीसाठी राज्यसरकार सरसावले

ebola
मुंबई – आफ्रिकेतल्या झपाटयाने प्रसार होत असणा-या इबोला रोगाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांना या रोगाबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय इबोलाचा रुग्ण आढळल्यास तातडीने राज्य सरकारला त्याची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले आहे. अशा रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांतील काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आफ्रिकेतून महाराष्ट्रात येणा-या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या रोगाबाबत निदान करण्यासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वायरॉलॉजीकडे काही नमुने पाठवले जाणार आहेत.

मुंबईत दोन अॅम्ब्युलन्स तात्काळ सेवेसाठी तैनात असतील. या रोगाचे रुग्ण आढळल्यास या अॅम्ब्युलन्स तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील. शिवाय मुंबईतल्या तीन सरकारी रुग्णालयांत प्रत्येकी १० खाटा राखीव ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विमानतळावरही याबाबत तपासणी केली जात असून विमानतळ प्रशासनाशी समन्वय ठेवण्यात आलेला आहे.

Leave a Comment