आजचा सुपरमून जगाच्या अंताची सुरवात करणार ?

super
लंडन – आजची राखीपौर्णिमा जगाच्या अंताची सुरवात करणारी ठरणार असल्याची भीती लंडनमधील कांही धार्मिक संस्थांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमून आहे. सर्वसाधारणपणे अशा वेळी पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखी उद्रेक अथवा समुद्रात मोठ्या लाटा उसळणे अशा घटना घडतात. आजचा सुपरमून भूकंप, जीवघेणा प्लेग, ज्वालामुखीच्या उद्रेकांना चालना देणारा असेल असे या संस्थांचे म्हणणे आहे.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळून जातो तेव्हा समुद्राला मोठी भरती येणे, पृथ्वीच्या पोटातील प्लेट सरकणे असे प्रकार घडतात. ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबल मध्ये असे दाखले दिले गेले आहेत. आज सायंकाळी चंद्र पृथ्वीपासून २२१७६५ मैलांवरून जाणार आहे. यावेळी तो नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा १६ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रकाशमान दिसणार आहे. नेहमीच्या अंतरापेक्षा तो ८६३ मैलांनी जवळून जाणार आहे. अशा वेळी गुरूत्वाकर्षणाचा दाब वाढतो व त्यामुळे समुद्रपातळीत वाढ होणे, भूकंप, ज्यालामुखी, त्सुनामी लाटा अशी शक्यताही वाढते.२००४ च्या बॉक्सिंग त्सुनामीच्या वेळीही असाच सुपरमून होता. यंदाही अटलांटिक भागात असलेले बर्था नावाचे चक्रीवादळ आज ब्रिटनवरून जाण्याचा संभव व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment