माळीणमध्ये सामुहिक दशक्रिया विधी

maalin
पुणे : अत्यंत शोकाकुल वातावरणात रविवारी आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेतील 151 मृतांचा सामुहिक दशक्रिया विधी पार पडला. या वेळी विधानसभा सभापती दिलीप वळसे-पाटील, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यासह मृतांचे नातेवाईक आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

माळीण हे गाव डोंगरकडा कोसळून मातीच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले होते. 151 नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. माळीणगावात अत्यंत शोकाकुल वातावरणात या मृतांचा दशक्रिया विधी रविवारी सकाळी 8.30 ते 10.30 वा वेळेत पार पडला. दशक्रिया विधीसाठी एकच पिंड ठेवण्यात आला होता. उपस्थित नातेवाईकांना भावनावेग आवरने कठीण झाल्याने अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सामुहिक विवाह सोहळयांची परंपरा असलेल्या आंबेगाव तालुक्यावर माळीण दुर्घटनेमुळे सामुहिक दशक्रिया विधी करण्याची वेळ आली.

राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी माळीण दुर्घटनेतील मृतांचे गावातच स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment