नारळाची तिखट कचोरी

kachori
गोड पदार्थांबरोबर कांही तिखट, चमचमीत असेल तर खाण्याची रूची नक्कीच वाढते. यासाठी नारळाच्या कचोरीची माहिती घेऊया.
साहित्य- खोवलेला नारळ १, बटाटे अर्धा किलो, कांदे दोन, ब्रेडचे चारपाच स्लाईस, हिरव्या मिरच्या चार ते पाच, कोथिंबीर, चवीनुसार साखर व मीठ, तळण्यासाठी तेल

प्रथम बटाटे मऊ शिजवून कुसकरावेत. त्यात ब्रेडचे पाण्यातून काढलेले व घट्ट पिळून घेतलेले स्लाईस कुसकरावेत. चवीनुसार मीठ घालावे आणि या मिश्रणाचा गोळा बनवावा. नारळ खरवडून घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घालावेत. कोथिंबीर घालावी. कांदा बारीक चिरून घालावा आणि चवीनुसार साखर व मीठ घालून सारण तयार करावे.

हाताला थोडे तेल लावून लिंबाच्या आकाराचा बटाट्याचा गोळा घ्यावा आणि त्याची पारी बनवावी. नंतर त्यात मावेल तेवढे नारळाचे सारण घालावे आणि तोंड बंद करून गोल आकाराची कचोरी बनवावी. अशा सर्व कचोर्याट तयार करून तेलात मंद आचेवर तळाव्यात अथवा शॅलो फ्राय कराव्यात. चटणी अथवा टोमॅटो सॉस बरोबर खायला द्याव्यात. बटाट्याच्या लगद्यात ब्रेड मिसळल्यामुळे कचोरी खुटखुटीत होते आणि तळताना फुटत नाही.

Leave a Comment