तिबेटमध्ये बस दरीत कोसळली ,४४ ठार

tibet
बीजिंग – तिबेटमध्ये सहलीची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४४ जण ठार तर ११ जण जखमी झाले. ५० प्रवाशांना घेऊन चाललेली एसयुव्ही बस एका पिक- अपवर आदळल्यानंतर दरीत १० मीटर खोल कोसळल्याने संध्याकाळी साडेचार वाजता हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली.

पिक- अपमधील अन्य पाच प्रवासी नॅमो राज्यातील राजधानी ल्हासाच्या पश्चिमेतील स्वायत्त तिबेट प्रदेशातील आहेत. तर बस मधील बहुतांश प्रवासी अनहुई, शांघाय, शानदोंग आणि हेबई प्रदेशातील आहेत. त्यांच्यावर ल्हासातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Comment