डोके उडवून देण्याची धमकी देत असे झुकेरबर्ग

mark
आपल्या फेसबुक या सोशल मिडीया साईटला अल्पावधीत अब्जाधीश कंपनींच्या यादीत नेऊन बसविणारा कंपनीचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग समाधानकारक काम न करणार्‍या कर्मचार्‍याना जपानी सामुराई तलवारीने डोके उडविण्याची धमकी देत असे असे कंपनीतील माजी कर्मचार्‍याने लिहिलेल्या एका पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

नोहा कगन नावाचा हा कर्मचारी फेसबुकमधील ३० नंबरचा कर्मचारी होता. त्याने केवळ आठ महिने या कंपनीत काम केले आणि २००६ मध्ये त्याला काम चांगले नसल्याबद्दल नोकरीला मुकावे लागले. त्यावर नोहाने हाऊ आयय लॉस्ट माय १७० मिलीयन डॉलर्स या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात तो लिहितो झुकेरबर्ग कर्मचार्‍यावर तार स्वरात ओरडत असे आणि त्यांना डोक उडविण्याची धमकीही देत असे. हा त्याच्या अपरिपक्व व्यवस्थापन स्टाईलचा भाग होता. जे कर्मचारी त्याच्या पसंतीस उतरेल असे काम करत नसत, त्यांना तो जपानी सामुराई तलवारीने डोके उडवीन अशी धमकी देत असे.

एकदा झुकेरबर्गने एका इंजिनिअरचे काम त्याला आवडले नाही म्हणून इंजिनिअरच्या संगणकावर पाणी फेकले होते आणि तो त्याच्या अंगावर जोरात ओरडला होता. नोहालाही अकार्यक्षम असल्याचे सांगून नोकरीवरून कमी केले गेले व त्याबरोबर त्याचा फेसबुक मधला ०.१ टक्के शेअरही गेला. आजच्या भावाने या वाट्याची किंमत होते १७० मिलीयन डॉलर्स.

Leave a Comment