जपानचा उत्तर भाग भूकंपाच्या धक्क्याने हदरला

earth
टोकियो – आज सकाळी ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जपानचा उत्तर भाग हादरला असून या भूकंपामुळे त्सुनामी येण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोणतीही जिवितहानी अथवा वित्तहानी या भूकंपामुळे झालेली नाही.

भूकंपाचा केंद्र बिंदू जपानच्या ओमोरी प्रांतापासून ३७ किलोमीटर अंतरावर समुद्रात होता. ओमोरी टोकियोपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर आहे.

जपानमध्ये दरवर्षी विविध ठिकाणी भूकंप होतात. मात्र इमारतींच्या रचनेबाबत तेथे काटेकोर नियम पाळले जात असल्याने कमी प्रमाणात हानी होते. गेल्या मे महिन्यात जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाचा धक्का बसला होता. यामध्ये १७ जण जखमी झाले होते.

Leave a Comment