इराणमध्ये विमान कोसळले ,४८ ठार

iran
दुबई – इराणमध्ये विमान तळावरून उड्डाण घेताच एक प्रवासी विमान काही मिनिटात कोसळले, या दुर्घटनेत प्रवासी आणि वैमानिकांसह एकूण ४८ जण ठार झाल्याचे वृत्त इराणच्या माध्यमांनी दिले आहे. तेहरानच्या मेहराबाद विमान तळावरून या विमाने उड्डाण केले होते . हे विमान तबासला चालले होते.

तेहरानच्या अझद परिसरातील रहिवासी भागात हे विमान कोसळले. आपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन प्रवाशांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या अपघातातील प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात हलवण्यात येत आहेत. मृतांमध्ये दोन बालके `आणि तीन १२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे.

विमानाचे इंजिन अचानक बंद पडल्याने ते कोसळले , अशी माहिती इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने दिली आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे देशातील एअर लाईन्सना सतत अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप इराणच्या राजकारण्यांनी केला आहे.

Leave a Comment