स्वतःच असेंबल होणारा ओरीगामी रोबो तयार

origamo
हॉवर्ड एमआयटी मधील संशोधकांनी ओरिगामी फ्लॅट पॅक रोबो विकसित करण्यात यश मिळविले आहे. अंतराळात रोबो पाठविण्याच्या उपक्रमात हे रोबो अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे संशेाधक रोब वुड यांचे म्हणणे आहे.

वुड यांनी दिलेल्या माहितीनुसार जपानात कागदाच्या वैशिष्ठ्यपूर्ण घड्या घालून अनेक वस्तू बनविण्याची ओरिगामी कला फार प्रसिद्ध आहे. हा रोबो बनविताना याच तंत्राचा वापर केला गेला आहे. हा रोबो स्वतःच ठिकठिकाणी मुडपतो आणि केवळ चार मिनिटांत पुन्हा मूळ आकार आपलाआपच धारण करू शकतो. यासाठी आपोआपच आकसू शकतात अशा पदार्थांचा वापर केला गेला आहे. मुलांची सॉफट टॉय बनविण्यासाठी या पदार्थांचा वापर केला जातो. वुड यांच्या मते स्वतःचा स्वतः असेंबल होऊ शकणारा रोबो हे नक्कीच मोठे यश आहे.

भविष्यात अंतराळात सोडल्या जाणार्‍या उपग्रहात या रोबोंचा वापर फार महत्त्वाचा ठरेल कारण अंतराळात गेल्यावर आपोआपच हे रोबो असेंबल होऊ शकतील आणि त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडू शकतील.

Leave a Comment