भारतासोबत संबंध सुधारण्याची वेळ आली – नवाझ शरीफ

sharif
इस्लामाबाद – पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यात पाकिस्तानला अपयश आल्याची कबुली आज दिली. पण आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची वेळ आलेली आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

नवाझ शरीफ आज राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला संबोधित करीत त्यावेळी भारतसोबत आपण चांगले संबंध ठेवू शकलो नाहीत, याची खंत नेहमीच राहणार असून पण, अजूनही वेळ गेलेली नसून दोन्ही देशांमध्ये चांगले व मैत्रीचे संबंध विकसित करण्याची खरी वेळ आल्याचे शरीफ यांनी सांगितले.

या संदर्भात दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची लवकरच बैठक होणार असून ही बैठक म्हणजे चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊलच ठरू शकते, असे सांगताना शरीफ म्हणाले की, आम्हाला अफगाणिस्तानसोबतही मैत्रीचे संबंध हवे आहेत. या देशात येणार असलेले नवे सरकार पाकला सर्वच क्षेत्रात सहकार्य करेल, असा विश्‍वास आहे.

Leave a Comment