चिमुकल्याने व्हाईट हाऊस सुरक्षा भेदल्याने एकच धावपळ

whitehouseवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इराकवरील अमेरिकन हवाई हल्यासंदर्भात राष्ट्राला उद्देशून देणार असलेला संदेश नियोजित वेळेपेक्षा उशीरा दिला गेला व त्यासाठी कारण ठरला एक चिमुकला मुलगा. या मुलाने व्हाईट हाऊसचा सुरक्षा घेरा आरामात फोडून आवारात प्रवेश करून एकच धमाल उडवून दिली व परिणामी ओबामांना उशीर झाला असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या आईवडिलांबरोबर या भागातून जात असलेले हे चिरंजीव स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास आईवडिलांपासून दूर गेले आणि न कळत त्याने व्हाईट हाऊसचा सुरक्षा घेरा फोडून आत प्रवेश केला. या परिसरात बसविल्या गेलेल्या १३२ कॅमेर्‍यांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणांना या घुसखोरीची माहिती दिली आणि रक्षकांची एकच धावपळ उडाली. त्याचवेळी ओबामा राष्ट्राला उद्देशून संदेश देण्यासाठी निघाले होते. मात्र उडालेल्या गडबडीमुळे त्यांना कांही काळ अडकून पडावे लागले. परिस्थिती निवळताच ओबामांनी संदेश वाचला.

Leave a Comment