आता येणार दहिहंडीच्या थरांना लिमिटेशन

dahi-hnadi
मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या जास्त शहरात मोठ्या जोशात आणि उल्हासात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. पण यंदा या उत्सवाला कोणाची नजर लागली आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही, कारण पहिल्यांदा बाल गोविंदांवर आलेली बंदी त्यानंतर डीजेंवर बंदी आणि आता आली आहे दहिहंडीत उंचच-उंच थरांना लगाम लागण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने दहिहंडीच्यादरम्यान होणा-या अपघातांमुळे थरांवर मर्यादा आणण्याचे आणि लहान मुलांचा समावेश न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

दहिहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाबाबत न्यायाधीश व्ही. एम. कानडे आणि पी. डी. कोदे यांच्या पीठासमोर स्वाती पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली.

न्यायालयाने मुंबई पोलिस कायदा किंवा अन्य कायद्याअंतर्गत १८ वर्षाखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास मज्जाव करावा, याबाबतची अधिसूचना जारी करावी असे आदेशही दिले.

Leave a Comment