अखेर पुणे विद्यापीठाचे झाले नामकरण

pune-university
पुणे – राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत आज पुणे विद्यापीठाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असा नामविस्ताराचा समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यापुढे पुणे विद्यापीठ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाईल.

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत जानेवारी महिन्यात पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून विद्यापीठाचे नामांतर करण्याची मागणी नामांतर कृती समितीतर्फे केली जात होती.

मागील महिन्यात सरकारने नामविस्ताराचा ठराव मंजूर केला होता. तसेच मागील आठवड्यात याबाबत अध्यादेश काढला होता. त्यानंतर लागलीच नामविस्ताराचा समारंभ आयोजित करून नामविस्तार करण्यात आला आहे.

Leave a Comment