सरावा दरम्यान बालगोविंदाचा मृत्यू

dahihandi
नवी मुंबई – उच्च न्यायालयात दहिहंडीमध्ये बालगोपाळांचा सहभाग असावा की नसावा यावर एक याचिकाही दाखल करण्यात असताना याच दरम्यान एका बालगोविंदावर काळाने झडप घातल्यामुळे दहीहंडी उत्सवात बालगोविंदाना सहभागी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सानपाडा येथील १४ वर्षाच्या किरण तळेकरचा दहीहंडीचा सराव दरम्यान मृत्यू झाला असून किरण पहिल्याच दिवशी सरावाला गेलेला होता.

दहिहंडीच्या पाचव्या थरावर पहिल्याच दिवशी किरणला चढविण्यात आले होते. तेथून कोसळल्यानंतर त्याला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान किरणचा प्राणज्योत मालविली आहे.

Leave a Comment