राज्य सरकारची अभिनव योजना, खबर देणा-यास एक कोटीचे बक्षीस

maowadi
मुंबई – आंध्रप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे माओवाद्यांना पकडण्यासाठी बक्षिसे जाहीर केले आहेत त्याच पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारने राज्यातील माओवाद्यांना पकडण्यासाठी अशीच अभिनव योजना आणली असून माओवाद्यांच्या जनरल सेक्रेटरी किंवा पॉलिट ब्युरो सेक्रेटरीची जो खबरी माहिती देईल, त्याला एक कोटींचे बक्षिस देण्यात येईल.

त्याचप्रमाणे ही बक्षिसे माओवाद्यांची पदे आणि वर्गवारीनुसार दिली जाणार आहेत. दोन लाखांपासून एक कोटीपर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. सरकारने याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढला असून अशा पद्धतीने बक्षिसे दिल्याचे आंध्रप्रदेशात सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

आपला जीव धोक्यात घालून खबरी माओवाद्यांची माहिती देतात. मात्र त्यांना तुटपुंजी रक्कम बक्षिस म्हणून दिली जात होती. त्यामुळे माओवाद्यांची माहिती देण्यास खबरी धजावत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारनेही बक्षिसाच्या रक्कमेत भरघोस वाढ केली.

६० लाखांचे बक्षिस पॉलिट ब्युरो सदस्य, रिजीनल ब्युरो सचिव, सेंट्रल मिलीटरी कमिशन सचिव आदींची माहिती देणा-यास देण्यात येईल. त्याच बरोबर केंद्रीय कमिटी सदस्य, रिजीनल ब्युरो सदस्य, सेंट्रल टेक्नीकल टीम सचिव यांची माहिती देणा-याला ५० लाखांचे बक्षिस मिळेल. खबर दिल्यानंतर संबंधित माओवादी पकडला नाही तर बक्षीस देण्यात येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.

Leave a Comment