मेटेंच्या शिवसंग्रामला हव्यात नाशिकमधून २ जागा

mete
नाशिक – शिवसंग्रामचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये नुकताच मराठा आरक्षण आभार मेळावा पार पडला. यावेळी मेटेंनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी नाशिक जिल्ह्यातून महायुतीकडे दोन जागांची मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी सांगितले.

आम्ही अवास्तव जागांची मागणी केली नसून माध्यमानी चुकीचे चित्र निर्माण केल्याचेही त्यानी सांगितले. त्याच बरोबर उद्योग मंत्री नारायण राणे हे जर मराठा आरक्षणाचे श्रेय घेत असतील त्याला आमची काही हरकत नाही.

मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी नाशिकमधील नेत्यांनीही विरोध केल्याचा टोला छगन भुजबळ यांचे नाव न घेता शेट्टी यांनी लगावला.

Leave a Comment