पंकजा मुंडेंचा होणार मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

pankaja-munde
मुंबई – गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी मागील काही महिन्यापासून सुरु असलेल्या केंद्रात जावे की राज्यात रहावे या संभ्रमावर अखेर पडदा टाकला असून त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या महिन्यात मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून पंकजाला स्थान मिळणार असल्याचे संकेत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी दिले आहेत. त्यानंतर पंकजानी राज्यात न थांबता दिल्लीत जाण्याचा निर्णय पक्का केला आहे.

काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौ-यावर होत्या. त्यावेळी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधला असून तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना केंद्रात जावे असे सांगितले. पंकजा यांच्यात गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्वाचे गुण पंकजात असल्याचे दिसून आले असून बहुजन समाज भाजपमागे कायम ठेवायचा असल्यास पंकजाला महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल असे भाजपमधील धुरिणींना वाटत असल्यामुळेच पंकजाला राज्यात न ठेवता दिल्लीत पाठवावे असे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.

Leave a Comment