निवडून येणाऱ्यांनाच मिळणार तिकीट – मुख्यमंत्री

prithviraj-chavan
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्याच उमेदवाराला काँग्रेस पक्ष तिकीट मिळेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

क्रांतीदिनानिमित्त आज शहीदांना वंदन करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीशी संबंधित प्रश्नांची सरबत्ती केली असता चव्हाण म्हणाले, जो उमेदवार योग्य पात्रतेचा व जिंकून येण्याची क्षमता ठेवेल अशांच काँग्रेसमध्ये यंदा तिकीट मिळेल. आपल्या नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी राज्यातील अनेक नेते मागत असून तत्पूर्वी नारायण राणे यांनीही आपला मुलगा कणकवलीतून व आपण कुडाळमधून निवडणूक लढवू असे जवळपास जाहीरच केले आहे. त्याचा संदर्भ घेत पत्रकारांनी छेडले असता चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Loading RSS Feed

Leave a Comment