नियमापेक्षा कमी पीएफ कापणार्‍या कंपन्यांवर चौकशीची गदा

epf
नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) १२ टक्के पीएफ कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनातून कापण्याचा नियम असताना, त्यापेक्षा कमी पीएफ कापणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पीएफला विविध भत्त्यांमध्ये काही कंपन्या वाटत असल्याने ईपीएफमधील योगदान कमी होत असल्यामुळे अशा कंपन्यांची चौकशी करण्यासाठी १२० पेक्षा जास्त क्षेत्रीय कार्यालयांना ईपीएफओने कामाला लावले असून त्याचबरोबर येत्या ३१ ऑगस्टपर्यंत चौकशीचे काम पूर्ण करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

अनेक कंपन्यांनी पीएफमधील आपले योगदान कमी करण्यासाठी कर्मचार्‍यांचे वेतन वेगवेगळ्या प्रकारच्या भत्त्यांमध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रादेशिक कार्यालयांनी ७ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे आदेश ईपीएफओ दिले आहेत.

Leave a Comment