एकही जागा राष्ट्रवादीला नाही मिळणार वाढवून

manikrao-thakare
मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवून मिळणार नसल्याचे ठणकावून सांगितले असून जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला राहिल असेही त्यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वारंवार आघाडी तोडण्याची भाषा केली होती आणि आता पुन्हा तीच भाषा विधानसभा निवडणूकीत जागावाटपावरून करीत होती पण त्यावर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत चर्चा होऊन पडदा पडलेला आहे.

पण काल पुन्हा निम्म्या जागांची राष्ट्रवादीने मागणी केली आहे. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी एकही जागा वाढवली जाणार नसल्याचे म्हटले आहे, मात्र याबाबतचा फायनल निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जाईल असेही ते म्हणतात.

एकीकडे केंद्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी म्हणून लढण्याचे ठरवत आहे. तर राज्यातील आघाडीचे नेते मात्र या विरोधी विधाने करताना दिसत आहेत. यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार ठरू शकते.

Leave a Comment