अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला १३ कोटींचा दंड

reliance
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने लाभाच्या प्रमाणाचा अहवाल जारी न केल्याने सेबीने त्यांच्याकडून १३ कोटीचा दंड आकारला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने संरचनात्मक कराराचे उल्लंघन केले असून सातवर्षांपुर्वीच्या एका प्रकरणाचा तपास केल्यानंतर सेबीने कारवाईचे आदेश दिले होते. सेबीने आतापर्यंत केलेल्या कारवाई पैकी ही सर्वात मोठी कारवाई आहे.

एप्रिल 2007 मध्ये या आर्थिक घडामोडींनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्वीच्या सर्वसाधारण शेअर बाजारातील भांडवलात घट झाली होती. पण कंपनी सहा तिमाहींपर्यंत शेअर लाभाचे प्रमाण जाहीर केले नव्हते.

तिमाहीतील लाभाबाबत शेअर बाजाराला अंधारात ठेवल्याबद्दल 15 पानांच्या आपल्या आदेशात नियंत्रक मंडळाने रिलायन्सवर आरोप ठेवून कंपनी विरोधात कराराचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई सुरु केली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रिलायन्सला कारणे दाखवा देखील नोटीस जारी करण्यात आली होती.

Leave a Comment