अंबानींची तिसरी पिढी घरच्या व्यवसायात

ambani
मुंबई – देशातील बडा उद्योगसमुह म्हणून ख्याती असलेल्या रिलायन्स समुहात अंबानी यांच्या परिवारातील तिसरी पिढी सहभागी झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश यांचा मोठा मुलगा आकाश रिलायन्स जिओ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीत कार्यरत झाला आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही कंपनी रिलायन्स समुहातील सहाय्यक दूरसंचार कंपनी असून त्यात ३३ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही कंपनी पुढच्या वर्षात त्यांच्या सेवा सुरू करणार आहे.

मुकेश यांचे धाकटे बंधू अनील अंबानी यांचा मुलगा जय अनमोल याच्यावरही येत्या कांही वर्षात मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एक महिन्यापूर्वीच जय अनमोलने रिलायन्स कॅपिटल मध्ये कामास सुरवात केली आहे. मुकेश यांचा धाकटा मुलगा अनंत तसेच अनील यांचा धाकटा मुलगा जय अंशुल सध्या अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेत असून शिक्षण पूर्ण होताच तेही घरच्या व्यवसायात उतरणार आहेत असे समजते.

Leave a Comment