स्नोडेनचा रशिया मुक्काम ३ वर्षांनी वाढणार

snowden
मास्को – अमेरिकेच्या सर्वाधिक वाँटेड यादीत असलेल्या स्नोडेनला रशियात आणखी तीन वर्षे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेत काम करणार्‍या एडवर्ड स्नोडेनने अमेरिकेच्या गुप्त हेरगिरीचे बिंग फोडून रशियात ताप्तुरता आश्रय घेतला होता. त्याची मुदत आता संपत आली होती.

युक्रेन प्रकरणापासून रशिया अमेरिका आणि अन्य युरोपिय देशांचे संबंध फारच बिघडले आहेत. कॉल्डवॉरपेक्षाही हे संबंध अधिक ताणले गेले आहेत. युक्रेन वॉरनंतर अमेरिका आणि युरोपातील अन्य कांही देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. रशियाने स्नोडेनला आणखी तीन वर्षे राहण्याची दिलेली परवानगी अमेरिकेचा बदला या स्वरूपात पाहिली जात आहे.

Leave a Comment