
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांची जिव्हाळ्याची असणारी विधानसभा निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे. या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची मुदत 7 डिसेंबर अशी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिली होती. ही माहिती चुकीची असल्याचे विधीमंडळ सचिवांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच उडणार निवडणुकीचा बार !
खर पाहता सात नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार असल्यामुळे त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन, नव्या सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या चार राज्यांच्या विधानसभेच्याही निवडणुकाही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यानच पार पडणार आहेत.
त्यामुळं आता पाऊसपाणी, थंडी-वारा अशा कुठल्याही विघ्नांना सामोरं जात सप्टेंबर – ऑक्टोबरमध्येच महाराष्ट्राची रणधुमाळी उरकली जाईल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
