शरीर पारदर्शक करण्याचे तंत्रज्ञान विकसित

tech
मानवी शरीर काचेप्रमाणे पारदर्शक करण्याचे तंत्रज्ञान कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. यामुळे मानवी शरीरातील अवयव तसेच पेशी कसे कार्य करतात याचे निरीक्षण करता येणार आहे आणि यामुळे कॅन्सर अथवा विषाषूंचा शोध घेण्यासही मोठीच मदत मिळणार आहे. उंदरांवर यासंबंधात केलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत आणि आता मानवांवर हे प्रयोग सुरू झाले असल्याचे समजते.

गेले शतकभर वैज्ञानिक मानवी शरीर पारदर्शी करता येईल काय याचे प्रयोग करत आहेत. त्यात शरीर पारदर्शी करण्यात यश आलेही आहे मात्र त्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होत असल्याने हे प्रयोग केले जात नाहीत. आता नवीन संशोधकांनी त्यासाठी तीन स्तरीय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यात नरम प्लॅस्टीकच्या सहाय्याने पेशींना आधार दिला जातो तसेच रक्तप्रवाहातून नसा साफ करणारा द्रव सतत सोडला जातो. हा द्रव विरघळला की अवयव पारदर्शक होतात. याच मिश्रणांत कांही रंगद्रव्ये मिसळली तर शरीरातील महत्त्वपूर्ण जोड पाहता येतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

विवियन गार्डिनास आणि त्यांच्या टीमने हे प्रयोग केले आहेत. ते म्हणतात, स्कॅनिंगच्या सहाय्यानेही मानवी शरीरात डोकावता येते मात्र त्या पेशींचे कार्य कसे चालले आहे किंवा पेशी नककी कोणते कार्य करत आहेत हे समजत नाही. या नव्या तंत्रज्ञानामुळे त्याचीही माहिती मिळू शकणार आहे.

Leave a Comment