अर्जुन पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी कपिल देव

kapil-dev
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाला पहिलाच विश्वचषक जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार व अष्टपैलू कपिल देव याची उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडापटूंना देण्यात येणाऱ्या अर्जुन पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही माहिती क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आलेली असून कपिल देव यांच्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट गुरूंसाठी असलेल्या द्रोणाचार्य पुरस्कार निवड समितीच्या प्रमुखपदी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कपिल देव यांनी १६ वर्षांचे असताना आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांनी १३१ कसोटी सामन्यांत ४३४ गडी बाद केले आहेत. १९८० मध्ये कपिल यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर अजितपाल सिंह यांना १९७२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment