हॉटेल वान्टन हाऊसला भीषण आग

fire
नवी मुंबई- नवी मुंबईतील वाशी परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी आहेत. जखमींपैकी २० जण जबर भाजले आहेत.

एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्टसर्किट आग लागली असून या आगीत हॉटेल वान्टन हाऊस जळून खाक झाले आहे. हॉटेलच्या खालच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेकांनी वरच्या मजल्यावर आश्रय घेतला.

मात्र, आग पसरत गेल्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही जणांनी थेट चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. यात ते जखमी झाले आहेत. या हॉटेलमध्ये एकूण २५ जण होते. यापैकी १५ जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी उशीरापर्यंत येथे अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरु होते.

Leave a Comment