शाई नाही केमिकल फेकले – हर्षवर्धन पाटील

patil
इंदापूर- सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्यावर धनगरांनी फेकलेली शाई ही शाई नसून केमिकल असल्याचा आरोप केला आहे. जेंटियन वॉयलट या केमिकलची बाटलीही कार्यकर्त्यांकडून मिळाली असल्याची माहिती हर्षवर्धन पाटीन यांनी दिली आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आंदोलनाला विपरीत वळण लागले आहे.

तत्पूर्वी इंदापूरमधील भिगवण येथे आज धनगर समाजाच्या आंदोलकांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकली असून यात पाटील यांच्या डोळ्यात शाई गेल्यामुळे इजा झाल्याने त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल केले होते.

भिगवण येथील एक रुग्णालय व ट्रॉमा सेंटरचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे यासाठी आरक्षणासंबंधीच्या आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. यापुर्वी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावरही दगड मारले होते. त्यानंतर आज इंदापूर तालुक्याचे आमदार व सहकारमंत्री यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष केले आहे. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment