व्हॉट्सअॅप …पाच हजार कोटींचे नुकसान, मोबाइल कंपन्या संतप्त

whatsapp
नवी दिल्ली- व्हॉट्सअॅप आणि तत्सम अॅपमुळे एसएमएस, कॉलचे प्रमाण कमी होते, त्यामुळे मोबाइल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या संतप्त झाल्या आहेत .विशेष म्हणजे सुमारे पाच हजार कोटींचे नुकसान असल्याचा दावाही केला आहे.

व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, विबर, स्काइप यासारख्या अॅप्समुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्याची मागणी मोबाइल कंपन्यांनी केली आहे. या कंपन्यांकडून आकारले जाणारे शुल्काचा काही हिस्सा मोबाइल कंपन्यांना देण्यात यावा व उर्वरित सरकारने ठेवावा अशी मागणी कंपन्यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप आणि तत्सम अॅपमुळे एसएमएस, कॉलचे प्रमाण कमी होते. त्यातून देशातील मोबाइल कंपन्यांचे वर्षाला ५ हजार कोटींचे नुकसान होत असल्याचे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनधारकांच्या वाढत्या संख्येमुळे हा आकडा १६ हजार कोटींपर्यंत जाण्याची भिती ते व्यक्त करत आहेत. स्काइपवरून होणाऱ्या मोफत कॉल्समुळे जगभरातील दूरसंचार कंपन्यांचे ३६ अब्ज डॉलरचे नुकसान होते असा दावा करण्यात येत आहे . या कंपन्या पुरवत असलेली व्हॉइस कॉल आणि मेसेजिंगची सुविधा भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कक्षेत येते. या कंपन्या कुठलेही शुल्क न देता इंटरनेटच्या माध्यमातून परदेशात कॉल ट्रान्सफर करतात. मात्र मोबाइल कंपन्यांना हे करण्यासाठी इंटरकनेक्ट शुल्क द्यावे लागते. त्यामुळे या कंपन्या मोफत सोयीसुविधा पुरवितात. त्यामुळे कॉल किंवा एसएमएसचा वापर कमी करून डेटा पॅकचा अधिकाधिक वापर ग्राहकांनी सुरू केल्याने ट्रायने यासंदर्भात काही शुल्क लागू करण्याची गरज आहे. असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment