रेल्वे कॉन्स्टेबलच्या 17 हजार जागा भरणार

railway
नवी दिल्ली – रेल्वे स्थानके आणि चालू गाडयांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे कॉन्स्टेबलच्या 17 हजार 87 जागा भरण्याच्या प्रक्रियेत आहे. या व्यतिरिक्त 8 महिला कंपन्यांसाठी 1056 अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आली आहेत. महिला कंपन्यांसाठी आणखी 4192 पदे निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 1 जानेवारी 2014 रोजी, रेल्वे सुरक्षा दलात 57116 कर्मचारी असून यात 1403 महिला आहेत.रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

Leave a Comment