जेलीफिशचे भारतातील पहिले सरोवर सापडले

jelly
मरीन बायोलॉजिस्टनी भारतातील प्रचंड संख्येने जेलिफिश असलेले सरोवर गुजराथमध्ये शोधले असून हे भारतातील कदाचित पहिलेच सरोवर असावे असे बायोललॅजिस्टचे म्हणणे आहे. गुजराथेतील अरमाबाड गावाजवळ हे सरोवर आढळले असून वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बी. सी. चौधरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या सरोवराचा शोध लावला आहे.

पाच ते सहा हेक्टर परिसरात हे सरोवर पसरलेले आहे. पाणी कमी असेल तेव्हा किंवा पाणी स्वच्छ असेल तेव्हा बाहेरूनही या सरोवरातील जेलीफिश पाहता येतात. या सरोवरात जेलिफिशची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे हे जेलिफिश वर्षभर असतात. जेलिफिश जगभर ठराविक हंगामातच पाहायला मिळतात. या सरोवरात संशोधकांनी अंडरवॉटर कॅमेरयाच्या सहाय्याने जेलिफिशचे चित्रण केले आहे. हे जेलिफिश अप साईड डाऊन अशा नावाने ओळखले जातात कारण पाण्याच्या तळाशी सूर्यप्रकाश मिळण्यासाठी ते उलटे तरंगत असतात.

तज्ञांच्या मते भारताच्या किनारपट्टीवर अनेक भागात जेलिफिश आढळतात मात्र सरोवरात जेलिफिश सापडणे तसे दुर्मिळ असते. इलमल आयलंड पालाऊ मध्ये जगातले सर्वात प्रसिद्ध असे जेलिफिश सरोवर आहे.

Leave a Comment